वृत्तसंस्था/ रिनेसी, फ्रान्स
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूला तर पुरुष दुहेरीत सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांना दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात पी. व्ही. सिंधूने पहिला गेम 21-18 असा जिंकला. त्यानंतर थायलंडच्या के. सुपिंदाने दुसरा गेम जिंकून सिंधूशी बरोबरी केली. तिसरा गेम सुरू होण्यापूर्वी सिंधूला गुडघा दुखापतीच्या समस्या सुरू झाल्याने तिने हा सामना अर्धवट सोडून दिला. पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात इंडोनेशियाच्या मोहमद एहसान आणि हेंद्रा सेटिवान यांनी सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांचा 25-23, 19-21, 21-19 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले









