चीनला मागे टाकण्यासाठी भारताची योजना : 100 एकरात उभारणार प्रकल्प
नवी दिल्ली :
खेळणी उद्योगात चीनला मागे टाकण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच उत्तर प्रदेशात खेळण्यांचे उत्पादन 100 एकरच्या टॉय पार्कमध्ये सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया मिशनला साकारण्यात यूपी हे आघाडीचे राज्य म्हणून ओळखले जात आहे. या दिशेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अनेक प्रकल्प राबवले जात आहेत.
यमुना एक्स्प्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी येथे निर्माणाधीन टॉय पार्क क्लस्टर देखील यामध्ये एक महत्त्वाचा दुवा ठरत आहे. सेक्टर 33 मध्ये उभारण्यात येणाऱ्या या टॉय पार्कमध्ये औद्योगिक युनिटची पायाभरणी सातत्याने होत आहे. पुढील वर्षभरात येथे असलेले औद्योगिक घटकही आपले उत्पादन सुरू करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे लवकरच या टॉय पार्कच्या मदतीने भारताचा खेळण्यांचा बाजार चीनला मागे टाकून जागतिक पटलावर आपला दबदबा कायम ठेवण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
भारताची खेळणी 50 देशांमध्ये निर्यात
या टॉय पार्कच्या उभारणीनंतर अधिक उत्पादनाबरोबरच अधिक निर्यातीची हमी मिळणार आहे, 142 भूखंडांचे वाटप यमुना एक्स्प्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (येडा) चे अध्यक्ष अनिल कुमार सागर यांनी सेक्टर 33 मध्ये उभारण्यात येणाऱ्या टॉय पार्कमध्ये औद्योगिक युनिट्सच्या बांधकामाची पायाभरणी केली.
प्राधिकरणाकडून 100 एकर जागेवर टॉय पार्क उभारण्यात येत आहे. प्राधिकरणाने विविध श्रेणीतील 142 भूखंडांचे वाटप केले आहे. या औद्योगिक टॉय पार्क क्लस्टरमध्ये कारखाना उभारणीच्या कामाची पायाभरणी करण्यात आली.
काय म्हणाले अजय अग्रवाल
टॉय असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील एका वर्षात अनेक कारखान्यांचे बांधकाम पूर्ण होऊन उत्पादन सुरू होईल. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत खेळण्यांच्या आयातीत घट झाली आहे, तर निर्यातीत वाढ झाली आहे. ही निर्यात 60 टक्क्यांच्या जवळपास पोहचली असून हे पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया या महत्त्वाकांक्षी मिशनमुळेच शक्य होत आहे.









