वृत्तसंस्था/ निंगबो (चीन)
येथे सुरु असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिशा क्रेस्टो यांना उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हार पत्करावी लागली. तत्पूर्वी महिला एकेरीत पीव्ही सिंधू, पुरुष एकेरीत किरण जॉर्ज, प्रियांशु राजावत यांचे आव्हान यापूर्वीच समाप्त झाले होते.
मिश्र दुहेरीच्या शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हाँगकाँगची पाचवी मानांकित जोडी तेंग चुन मेन आणि तेसी सुएट यांनी कपिला आणि क्रेस्टो यांचा 22-20, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला दुसऱ्याच फेरीत हार पत्करावी लागली होती.









