6 महिन्यांमध्ये 933 कोटी रुपयांच्या घड्याळांची खरेदी
स्टेटस सिंबल ठरतेय स्वीस घड्याळ
मोबाईलचा वापर होऊ लागल्यावर कॅमेऱ्यांप्रमाणे घड्याळ देखील शोपीस ठरतील असे मानले जात होते, परंतु स्वीत्झर्लंडच्या घड्याळांच्या विक्रीची नवी आकडेवारी पाहिल्यास किंमत वाढूनही त्यांची मागणी वाढत असल्याचे दिसून येते. आता घड्याळांमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग होऊ लागले आहेत. मागील वर्षी जगभरात 2.34 कोटी स्वीस घड्याळांची विक्री झाली आहे. हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वोच्च ठरले आहे.
निर्यात करण्यात घड्याळांची संख्या 1.58 इतकी राहिली. स्वीस वॉच इंडस्ट्री फेडरेशननुसार लॉकडाउनमध्ये (2020) तयार 1.38 कोटी घड्याळांपेक्षा हा आकडा अधिक आहे, परंतु 2015 च्या (2.81 कोटी) तुलनेत कमी आहे. मागील 10-15 वर्षांमध्ये स्वीस घड्याळांची सरासरी किंमत वाढत आहे, परंतु विक्रीचा आकडा तितकाच राहिला आहे. लक्झरी वॉचच्या व्यवसायात हा नवा ट्रेंड असल्याचे ओमेगाचे सीईओ रेनाल्ड एस्क्लिमॅन यांनी म्हटले आहे.

मनगटी घड्याळ हे गरजेपेक्षा अधिक प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. काही ब्रँड्सनी वर्षात दोन-तीनवेळा किंमत वाढविली आहे. 2022 मध्ये 33 हजार रुपये किंमत असलेल्या घड्याळांची शिपमेंट 104 टक्क्यांनी वाढली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये स्वीत्झर्लंडमधून घड्याळांची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत 14.6 टक्के अधिक आहे. याचे श्रेय ‘मूनस्वॉच’ला आहे, कारण याच्या 10 लाख युनिट्सची विक्री झाली असल्याचे काउंटरपॉइंट संशोधन अहवालात नमूद आहे.
हाय एंड घड्याळांची निर्मिती
लुई वितों कंपनीने स्वीस घड्याळांकडून मिळत असलेल्या आव्हानादरम्यान सुमारे 21 वर्षांनी टँबोरचे नवे वर्जन सादर केले आहे. नव्या रेंजची किंमत 3.3 लाखापासून 4 लाख असू शकते. कंपनी आता हाय एंड घड्याळांचीच निर्मिती करणार असल्याचे वॉच डायरेक्टर जीन अर्नल्ट यांनी सांगितले आहे. जोपर्यंत उच्च गुणवत्ता कायम राहील, वॉच इंडस्ट्रीचा आउटलुक सकारात्मक राहणार आहे. रोलेक्स, ऑडेमर्स पिगुएट, रिचमोंट, पटेक फिलिप किंवा रिचर्ड मिल या कंपन्या बाजारात मोठी हिस्सेदारी मिळवून असून यात सातत्याने वाढत असल्याचे स्वीस कन्सल्टेंसी लक्सकंसल्टचे संस्थापक ओलिवर मुलर यांनी सांगितले आहे.
भारतीयही आघाडीवर
कंपन्यांचे लक्ष आता संख्या वाढविण्याऐवजी केवळ हाय एंड घड्याळांवर आहे. याचमुळे किंमत सातत्याने वाढत आहे. स्वीस घड्याळ खरेदी करण्यात भारतीय देखील मागे नाहीत. देशात चालू वर्षात जूनपर्यंत 933 कोटी रुपयांच्या स्वीस घड्याळांची विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत हे प्रमाण 21 टक्क्यांनी अधिक आहे. 2022 मध्ये 1723 कोटी रुपयांच्या घड्याळांची विक्री झाली होती. 2021 च्या तुलनेत हे प्रमाण 13.6 टक्क्यांनी अधिक आहे. महिलांदम्यान अधिक किमतीच्या घड्याळांच्या वाढत्या मागणीमुळे मीडिल रेंजची घड्याळे पसंत ठरत आहेत. यात रोलेक्स आणि स्वॅच ग्रूपसोबत फॉसिल ग्रूपच्या फॅशन ब्रँड्समध्ये डीकेएनवाय आणि एम्पोरियो अरमानी सामील असल्याचे भारतीय फर्म मोर्डोर इंटेलिजेन्सच्या अहवालात म्हटले गेले आहे.









