वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2026 च्या एएफसी 17 वर्षांखालील वयोगटातील होणाऱ्या आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेसाठी सोमवारी प्रमुख प्रशिक्षक जोकिम अॅलेक्झांडरसनने 23 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. सदर पात्र फेरीची स्पर्धा 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान किर्जीस्थानमधील बिश्केक येथे होणार आहे.
या स्पर्धेसाठी भारताचा ग गटात समावेश आहे. या गटामध्ये तीन संघ आहेत. भारतीय युवा महिला फुटबॉल संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना यजमान किर्जीस्थान प्रजासत्ताकबरोबर 13 ऑक्टोबरला तर त्यानंतर दुसरा सामना 17 ऑक्टोबरला उझबेकिस्तानबरोबर होणार आहे. पुढील वर्षी चीनमध्ये होणाऱ्या महिलांच्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत एकूण 12 संघांचा समावेश राहील तर किर्जीस्थानमध्ये होणाऱ्या पात्र फेरी स्पर्धेतील विजेता संघ चीनमधील स्पर्धेसाठी थेट पात्र ठरेल. भारतीय कनिष्ठ महिला फुटबॉल संघाने गेल्या ऑगस्टमध्ये भूतान येथे झालेल्या 17 वर्षांखालील वयोगटातील सॅफ महिलांची फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर या संघाकरिता बेंगळूर आणि गोवा येथे सराव शिबिर आयोजित केले होते. भारतीय महिला फुटबॉल संघ मंगळवारी बिशेख येथे दाखल होईल.
भारतीय महिला फुटबॉल संघ: गोलरक्षक-मुन्नी, सुरजमुनी कुमारी, टी. फातिमा, बचावफळी-एस. अलेनादेवी, अॅलिसा लिंगडोह, बिनीता होरो, दिव्यानी लिंडा, एलिझाबेद लाक्रा, जॉयशिनी चानु, रितू बादेक, तानिया देवी टी., मध्यफळी- अभिस्ता बासनेत्त, अनिता डुंगडुंग, बोनिफिलिया शुलाइ, जुलन नाँगमैथेम, प्रीतिका बर्मन, श्वेता राणी, टी. बास्की, आघाडीफळी-अनुष्का कुमारी, अन्विता रघुरामन, नीरा चानु, पर्ल फर्नांडीस, व्हॅलेना फर्नांडीस.









