बुडापेस्ट, हंगेऱी
भारतीय कुस्तीपटू सुजीत कलकलने येथे पोल्याक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले आहेत.
भारताच्या सुजीतने 65 किलोग्रॅम पुरुषांच्या फ्रीस्टाईल गटाच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत अझरबैजानच्या चार वेळा युरोपियन पदक विजेत्या अली रहिमजादेचा 5-1 असा पराभव केला. गुरुवारी सुजीतने मिळवलेले यश या वर्षीच्या कोणत्याही रँकिंग सिरीज स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक ठरले. यापूर्वी, भारतीय कुस्तीपटूंनी अम्मान आणि मंगोलियामध्ये एकही पदक मिळाले नाही. पहिल्या सत्रात, सुजीतने एक अॅक्टिव्हिटी पॉइंट गमावला आणि नंतर दुसऱ्या सत्रात दोन टेकडाउन पूर्ण करण्यासाठी वेग वाढवला. सुवर्णपदकाच्या लढतीत त्याने आणखी एक अॅक्टिव्हिटी पॉइंट मिळवला. 16 व्या फेरीत पॅरिस 2024 ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता अल्बानियाच्या इस्लाम दुदाएववर 11-0 असा विजय मिळवला. सुजीतचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय होता. सुजीतने क्वार्टर फायनलमध्ये युरोपियन रौप्यपदक विजेता फ्रान्सच्या खमजत अर्सामेरझोएववर मात केली आणि नंतर शेवटच्या चारमध्ये आर्मेनियाच्या वाझगेन तेवानयानवर 6-1 असा विजय मिळवला.
पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात, भारताने आणखी एक पदक पटकविले. राहुलने जर्मनीच्या निकलास स्टेचेलला 4-0 असे पराभूत करून कांस्यपदक पटकविले, त्याने क्वार्टर फायनलमध्ये कोरिया प्रजासत्ताकच्या किम सुंग-ग्वॉनचा 5-3 असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याला अमेरिकेच्या ल्यूक जोसेफ लिलेदाहलविरुद्धच्या चुरशीच्या लढतीत 7-6 असा पराभव पत्करावा लागला. भारताच्या उदित आणि विक्कीला अनुक्रमे 61 किलो आणि 97 किलो वजनी गटाच्या रेपेचेज फेरीत पराभव पत्करावा लागला.
बुडापेस्टमधील पॉलीक इमरे आणि वर्गा जानोस मेमोरियल ही या वर्षाची चौथी आणि शेवटची कुस्ती रँकिंग मालिका आहे. उपलब्ध रँकिंग गुणांमुळे कुस्तीगीरांना या वर्षाच्या अखेरीस सप्टेंबरमध्ये क्रोएशियाच्या झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी चांगले स्थान मिळविण्यात मदत होईल. रविवारी संपणाऱ्या बुडापेस्ट स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिला फ्रीस्टाइल तसेच ग्रीको-रोमन श्रेणींमध्ये कुस्तीगीरांना मैदानात उतरवले आहे.









