हरमनप्रीकडे नेतृत्वाची धुरा : शेफाली वर्माचे पुनरागमन
वृत्तसंस्था / मुंबई
बीसीसीआयने इंग्लंड विरुद्ध आगामी वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. अनुभवी हरमनप्रीत कौरकडे वनडे व टी 20 संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेसह इंग्लंड दौऱ्याची सुरुवात करणार आहे. त्यानंतर उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येईल. टी 20 मालिकेची सुरुवात 28 जून पासून होणार असून वनडे मालिकेतील पहिला सामना हा 16 जुलै रोजी होईल.
आगामी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी इंग्लंडचा दौरा महत्त्वपूर्ण असेल. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातून घरच्या मैदानात रंगणाऱ्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्यात हरमन ब्रिगेड कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे, आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी शेफाली वर्माची भारतीय महिला संघात एन्ट्री झाली आहे. तसेच सयाली सतघरेलाही टी 20 मध्ये संधी देण्यात आली आहे. याशिवाय, वनडे मालिकेत शुची उपाध्याय, क्रांतीसह, अमनजोत कौर आणि स्नेह राणा यांना संधी देण्यात आली आहे.
टी 20 साठी भारतीय महिला संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक) यास्तिका भाटीया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेहा राणा, श्रीचरणी, शुची उपाध्याय, अमनजोत कार, अरुंधती रे•ाr, क्रांति गौडा, सायली सतघरे.
वनडेसाठी भारतीय महिला संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), तेजल हसबिनस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्रीचरणी, शुची उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रे•ाr, क्रांती गौड, सयाली सतघरे.









