वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एएफसी यू-17 महिलांच्या आशियाई चषक पात्रता फेरीतील राऊंड 2 लढतीसाठी भारताने 23 सदस्यीय संघाची घोषणा केली. थायलंडमधील बुरिराम येथे ही स्पर्धा होणार आहे.
गेल्या एप्रिलमध्ये पहिल्या राऊंडमध्ये अव्वल स्थान पटकावत भारताने राऊंड 2 मध्ये खेळण्यासाठी प्रथमच पात्र ठरले. भारताचा गट अ मध्ये समावेश असून त्यांच्यासोबर कोरिया प्रजासत्ताक, इराण, यजमान थायलंड यांचाही समावेश आहे. आशियाई चषक पात्रता राऊंड 2 स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारताचा यू2d17 महिला संघ : अनिशा ओराओन, खुशी कुमारी, खाम्बी चानू सारंगथेम, हीना खातून, विक्षित बारा, थोइबिसाना चानू टोइजम, अखिला राजन, आर्या अनिलकुमार, सोनिबिया देवी इरोम, ललिता बाजपेयी, मेनका देवी, जुही सिंग, बबिता कुमारी, शिलजी साजी, शिवानी टोपो, सिबानी देवी, सिन्डी रेमरुआतपुई कोलनी, रेमी थॉकचोम, सुलंजना राऊळ, अंजू चानू, खुशबू काशिराम सरोज, पूजा, प्रिया छेत्री. प्रमुख प्रशिक्षक प्रिया पीव्ही.
भारताचे सामने : 19 सप्टेंबर रोजी कोरियाविरुद्ध, 21 सप्टेंबर रोजी थायलंडविरुद्ध, 23 सप्टेंबर रोजी इराणविरुद्ध.









