वृत्तसंस्था/केपटाऊन (दक्षिण आफ्रिका)
भारतीय महिला हॉकी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर 4 सामन्यांची हॉकी मालिका खेळत आहे. या मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-2 असे गोल बरोबरीत रोखले. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयातील भारतीय हॉकी संघाचा हा शेवटचा सामना होता.
भारत आणि टॉप सिडेड नेदरलँड महिला संघामध्ये पुढील सामना होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयामध्ये भारतीय महिला हॉकी संघामध्ये एकही सामना गमाविला नाही. या शेवटच्या सामन्यात आठव्या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेचे खाते क्विनीटा बॉब्सने पेनल्टी स्ट्रोकवर उघडले. 29 व्या मिनिटाला वैष्णवीच्या शानदार गोलामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेशी बरोबरी साधली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 35 व्या मिनिटाला दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोल लोंबार्डने केला. 51 व्या मिनिटाला वैष्णवीने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून भारताला या सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधून दिली.









