वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून उभय संघात झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
या दौऱ्यातील आपल्या मोहिमेला भारतीय महिला हॉकी संघाने विजयाने प्रारंभ केला आहे. या दौऱ्यात भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ दक्षिण आफ्रिकेच्या 21 वर्षाखालील वयोगटाच्या महिला संघासमवेत आणखी दोन सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय कनिष्ठ हॉकी महिला संघाचे आणखी दोन सामने दक्षिण आफ्रिका अ महिला संघाबरोबर 24 आणि 25 फेब्रुवारीला होणार आहेत.
शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात भारतातर्फे दीपिका सिनियरने पहिल्या आणि 30 व्या मिनिटाला, उपकर्णधार रुजुता पिसाळने 18 व्या मिनिटाला, ऋतिका सिंगने 20 व्या मिनिटाला, सुनेलिता टोप्पोने 28 व्या मिनिटाला, दीपिका सोरेंगने 36 व्या आणि अनुने 44 व्या मिनिटाला गोल केले. दक्षिण आफ्रिका संघातर्फे एकमेव गोल 36 व्या मिनिटाला मिकिला लि रॉक्सने केला.









