वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चालु वर्षी चिलीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ट महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय कनिष्ट महिला हॉकी संघाकरिता युरोपचा दौरा आयोजित केला असून या दौऱ्यात पाच सामने खेळविले जाणार आहेत.
भारतीय कनिष्ट महिला हॉकी संघाचे हे सामने 8 ते 17 जून दरम्यान होणार आहेत. बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स बरोबर हे सामने आयोजित केले आहेत. अलिकडेच अर्जेंटिनामध्ये झालेल्या चार देशांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय कनिष्ट महिला हॉकी संघाने दर्जेदार कामगिरी केली होती. कनिष्ट भारतीय महिला हॉकी संघाचा युरोप दौऱ्यातील तीन सामने बेल्जियमबरोबर खेळविले जाणार आहेत. त्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होईल.









