► वृत्तसंस्था / बेंगळूर
भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ सोमवारी येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय महिला हॉकी संघ पाच सामने खेळणार आहे.
भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ सिडनीमार्गे कॅन्बेरामध्ये दाखल होईल. चिलीतील सॅन्टीयागो येथे 2025 च्या उत्तराधार्थ होणाऱ्या हॉकी इंडियाच्या कनिष्ठ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून हॉकी इंडियाने भारतीय संघासाठी हा दौरा आयोजित केला आहे. भारतीय महिला हॉकी संघ 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ऑस्ट्रेलियात पाच सामने खेळणार आहे. यापैकी पहिले तीन सामने ऑस्ट्रेलियन कनिष्ठ महिला संघाबरोबर होतील तर शेवटचे दोन सामने कॅन्बेरा चिली संघाबरोबर खेळविले जातील. हे सर्व सामने कॅन्बेराच्या राष्ट्रीय हॉकी मैदानावर आयोजित केले आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व ज्योती सिंगकडे सोपविण्यात आले आहे.









