वृत्तसंस्था/ ताश्कंद
एएफसी ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत प्राथमिक गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात व्हिएतनामने भारतीय महिला फुटबॉल संघाचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केल्याने भारतीय संघाचे ऑलिम्पिक स्पर्धेचे स्वप्न उध्वस्त झाले आहे.
रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या फेरीतील या सामन्यात व्हिएतनामने दर्जेदार खेळ करत भारताचे आव्हान संपुष्टात आणले. भारतातर्फे एकमेव गोल बदली खेळाडू संध्या रंगनाथनने केला. चौथ्या मिनिटाला कर्णधार हुएन नेहूने हेडरद्वारे व्हिएतनामचे खाते उघडले. 22 व्या मिनिटाला व्हिएतनामचा दुसरा गोल लीनने हेडरद्वारे केला. 73 व्या मिनिटाला बदली खेळाडू फेम येनने व्हिएतनामचा तिसरा गोल करून भारताचे आव्हान संपुष्टात आणले.









