वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कझाकस्तानबरोबर होणाऱ्या मित्रत्वाच्या दोन फुटबॉल सामन्यांसाठी भारताचा 20 वर्षांखालील महिलांचा फुटबॉल संघ प्रमुख प्रशिक्षक जॉकीम अॅलेक्सडर्सन यांनी जाहीर केला आहे. भारत आणि कझाकस्थान महिला फुटबॉल संघातील हे दोन सामने 25 आणि 28 ऑक्टोबर रोजी कझाकस्थानमध्ये खेळविले जाणार आहेत.
2026 च्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या एएफसी 20 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून हे दोन सामने आयोजित केले आहेत. भारतीय महिला फुटबॉल संघ : गोलरक्षक-मेलोडी चानु केशाम, मोनालीसा देवी, रिबान्सी जेमु, बचावफळी-सी. अॅलिना, सिंडी कोलेनी, जुही सिंग, निशीमा कुमारी, टी. रेमी, शुभांगी सिंग, टी. चानु तोजम, विकसित बारा, मध्यफळी-अंजू चानु, एन. अरिनादेवी, भूमीका देवी, खुशबू सरोज, नेहा, पूजा, आघाडीफळी-बबीता कुमारी, दिपीका पाल, काजोल डिसोजा, लेहिंगडेकीम, शिलाजी साजी, सिबानी देवी.









