वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2026 मध्ये होणाऱ्या एएफसी महिलांच्या आशिया चषक पात्र फेरीच्या थायलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी सोमवारी प्रमुख प्रशिक्षक क्रिस्पीन छेत्रीने 24 सदस्यांचा भारतीय महिला फुटबॉल संघ जाहीर केला. तथापि, या स्पर्धेतील होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी अंतिम 23 खेळाडूंचा संघ जाहीर केला जाईल.
थायलंडमध्ये होणाऱ्या पात्र फेरी स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश आहे. या गटामध्ये मंगोलिया, टिमोर लेस्टी, इराव आणि यजमान थायलंड यांचा सहभाग आहे. भारत मंगोलिया सामना 23 जूनला, भारत-टिमोर लेस्टी सामना 29 जूनला, भारत-इराक सामना 2 जुलैला तर भारत-थायलंड सामना 5 जुलैला होणार आहे. या स्पर्धेतील गटविजेता संघ ऑस्ट्रेलियात 2026 च्या मार्चमध्ये होणाऱ्याएएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरेल. तसेच 2027 मध्ये होणाऱ्या फीफाच्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियातील आशिया चषक फुटबॉल स्पर्धा पात्रतेची राहील. थायलंड दौऱ्यामध्ये सर्व सामने चियांग मेई स्टेडियमध्ये खेळविले जातील. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय महिला फुटबॉल संघाकरिता बेंगळूरमध्ये सहा आठड्यासाठी सराव शिबिर आयोजित केले होते.
भारतीय महिला फुटबॉल संघ:- गोलरक्षक-इलांगबाम चानू, एम. मोनालिसादेवी, पायल बासुदे, बचावफळी- हेमाम सिल्कीदेवी, किरण पिसादा, टी. मार्टिना, एन. स्वीटीदेवी, पी. निर्मलादेवी, पौर्णिमा कुमारी, संजू, एस. रंजना चानु, मध्यफळी: अंजू तेमांग, ग्रेस देंगमेही, ए. कार्तिका, एन. रत्नबालादेवी, एस. प्रियदर्शिनी,संगीता बेसफोर, आघाडी फळी: लिंडा कॉम सेर्टो, पी. मालविका, मनीषा कल्याण, मनीषा नाईक, पॅरी झेका, रिम्पा हलदार आणि जी. सौम्या.









