वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शेवटच्या सामन्यात षटकांची गती न राखता आल्याने भारतीय संघाला दंड करण्यात आला आहे. या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 43 धावांनी पराभव करुन मालिका 2-1 अशी जिंकली होती.
या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांना षटकांची गती राखता आली नाही. दरम्यान आयसीसीचे आंतरराष्ट्रीय पॅनलमधील सामनाधिकारी जी. एस. लक्ष्मी यांनी भारतीय संघाला या गुन्ह्dयाबद्दल दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने हा गुन्हा कबुल केला आहे. त्यामुळे आता भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधनातील 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.









