दोन सुवर्ण, एक रौप्य, तीन कास्यपदकांची कमाई
बेळगाव : जर्मनीतील वरण ड्रॉप येथे सीआयएसएम मार्शल नौदल विश्व स्पर्धेत भारतीय नौदल संघाने दोन सुवर्ण, एक रौप्य व कांस्यपदकची कमाई करीत यश संपादन केले आहे. महिलांच्या गटात 75 गुणांसह फ्रान्स पहिल्या क्रमांकावर, 74 गुणासह रुमानिया दुसऱ्या क्रमांकावर तर 70 गुणासह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतच्या 53 किलो वजनी गटात हवालदार ज्योतीने फ्रान्सच्या इटोनाचा पराभव करुन सुवर्णपदक पटकाविले. 76 किलो वजनी गटात सीपीओ रितीकाने बल्गेरियाच्या हसीनाचा 7-2 असा पराभव करुन सुवर्णपदक पटकाविले. महिला गटात शुक्रवारी झालेल्या 68 किलो वजनी गटात हवालदार प्रियांकाने इटलीच्या काढनेऔवाला चितपट करून विजय संपादन केला.
दुसऱ्या दिनाच्या सामन्यात प्रियंकाला फ्रान्सच्या किंद्रा कडून 7-2 असा पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रियांकाने रूसच्या केटरीयन हिला 8-6 अशा गुण फरकाने पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत मात्र प्रियांकाला फ्रान्सच्या किंद्रा कडून बायफोर्ट 10-0 असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात प्रियांकाला रौप्य पदकावरती समाधान मानावे लागले.दुसऱ्या सामन्यात 97 किलो वजनी गटात ग्रीक रोमन प्रकारात हवालदार सोनूला पहिल्या फेरीत तुर्कीच्या डोगन 0-10 अशा गुण फरकाने पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या फेरीत सोनूला अल्जेरियाच्या फाता मैदानात न आल्यामुळे पुढे चाल देण्यात आली. उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या लूखासने 9-0 असा एकतर्फी पराभव केला. त्यामुळे सोनूला कांस्य पदकावरती समाधान मानावे लागले. मान्यवरांच्या हस्ते विजत्यांना गौरविण्यात आले.









