वृत्तसंस्था/ वडोदा
भारतीय महिलांची लढत आज शुक्रवारी येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजशी होणार असून यावेळी भारताचा फलंदाजी विभाग अधिक मोठी झेप घेण्याचा आणि क्लीन स्विप नोंदविण्यास मदत करण्याचा प्रयत्न करेल.
बलाढ्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मालिकेत आणखी एका पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. मालिकेत सातत्याने 300 पेक्षा जास्त धावा करण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय आहे. ऑस्ट्रेलियासारख्या संघांविऊद्धच्या निराशाजनक कामगिरीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना अशा यशाची गरज होती.
स्मृती मानधनासह डावाची सुऊवात करणाऱ्या प्रतीका रावलने तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी केली नाही, परंतु दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळात लक्षणीय सुधारणा करून भविष्यात संघाला एक चांगली खेळाडू मिळण्याच्या आशा निर्माण केल्या. दिल्लीस्थित या क्रिकेटपटूने संघात शफाली वर्माची जागा घेतली आहे. हरलीन देओल बऱ्याच काळापासून खेळत आहे, परंतु ती मागील सामन्यातच तिचे पहिले एकदिवसीय शतक नोंदवू शकली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त राहिला आणि शेवटच्या सामन्यातही ती हीच गती कायम ठेवण्याची इच्छा बाळगून असेल.
कर्णधार हरमनप्रीत कौर पूर्ण तंदुऊस्ती मिळविल्यापासून चांगल्या स्थितीत दिसत आहे, पण तिला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. मालिका जिंकलेली असल्याने कर्णधार आता मुक्तपणे खेळून एक प्रभावी खेळी नोंदवू शकेल. गोलंदाजीच्या आघाडीवर रेणुका ठाकूरने वेगवान माऱ्याचे नेतृत्व चांगल्या प्रकारे केले आहे आणि तऊण तितास साधूही बळी घेत आहे. लेगस्पिनर प्रिया मिश्राने प्रभाव पाडला आणि ती आणखी एक चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा करेल. मालिका जिंकलेली असल्याने भारताला या सामन्यात तनुजा कंवर आणि तेजल हसनबिससह काही खेळाडूंची चाचणी घेण्याची संधी आहे.
भारताला पराभूत करण्यासाठी वेस्ट इंडिजला मार्ग शोधावा लागेल. दोन्ही सामन्यांमध्ये भारताला 300 पेक्षा जास्त धावा काढू दिल्यानंतर हेली मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील संघाने सर्व आघाड्यांवर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मॅथ्यूज ही एकमेव वेस्ट इंडिज फलंदाज आहे, जिने प्रभाव पाडलेला आहे.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 पासून.









