आयएनएस तुशील अन् आयएनएस तमाला
वृत्तसंस्था/ मॉस्को
भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौका सध्या रशियातील यांतर शिपयार्डमध्ये निर्माण केल्या जात आहेत. या दोन्ही युद्धनौका तलवार क्लास स्टेल्थ गायडेड मिसाइल फ्रिगेटचा हिस्सा आहेत. त्यांचे नाव आयएनएस तुशील आणि आयएनएस तमाला आहे.
आतापर्यंत या तलवार श्रेणीच्या 7 युद्धनौका निर्माण करण्यात आल्या आहेत. चार नव्या युद्धनौका निर्माण केल्या जात आहेत. यातील दोन रशियात तर दोन भारतात निर्माण होतील. या युद्धनौकांचे समुद्रात डिस्प्लेसमेंट 3850 टन असते. याची लांबी 409.5 फूट, बीम 49.10 फूट आणि ड्रॉट 13.9 फूट इतका असतो. या युद्धनौका सुमद्रात कमाल 59 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने संचार करू शकतात. या युद्धनौकांच वेग 26 किलोमीटर प्रतितास ठेवल्यास त्या 4580 किलोमीटरची कक्षा व्यापू शकतात. तर 56 किलोमीटर प्रतितासाचा वेग राखला गेला तर 2600 किलोमीटरची कक्षा व्यापू शकतात.
या युद्धनौका 18 अधिकाऱ्यांसमवेत 180 नौसैनिकांना घेऊन 30 दिवसांपर्यंत समुद्रात तैनात राहू शकतात. त्यानंतर त्यात रसद आणि इंधनपुरवठा करावा लागतो. या युद्धनौका इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टीमने युक्त आहेत. तसेच 4 केटी-216 डिकॉय लाँचर्स यात सामील आहेत. याचबरोबर 24 एचएचटीआयएल-1 मीडियम रेंजची क्षेपणास्त्रs तैनात आहेत.
8 इला-1ई, 8 व्हर्टिकल लाँच अँटीशिप मिसाइल क्लब, 8 वर्टिकल लाँच अँटीशिप आणि लँड अटॅक ब्राह्मोस देखील तैनात आहे. यात एक 100 मिलीमटरची ए-190ई नेवल गन तसेच एक 76 एमएमची ओटो मेलारा नेवल गन बसविण्यात आली आहे. 2 एके-630 सीआयडब्ल्यूएस आणि 2 काश्ताना सीआयडब्ल्यूएस गन देखील आहे. या धोकादायक गन्ससोबत दोन 533 मिलिमीटरच्या टॉरपीडो ट्यूब्स आहेत. याचबरोबर एक रॉकेट लाँचर देखील तैनात करण्यात आला आहे. या युद्धनौकेवर एक कामोव्ह-28 किंवा कामोव्ह-31 किंवा ध्रूव हेलिकॉप्टर तैनात केले जाऊ शकते.









