क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
जर्मनीतील वर्ल्ड ड्रॉप येथे होणाऱ्या सीआयएसएम मार्शल आर्ट वर्ल्ड मिलिटरी विश्व कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय सेनादल कुस्ती संघ रवाना होत आहे. या संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून बेळगावचे विनायक दळवी यांच्या नेतृत्वाखाली जात आहे.
या भारतीय संघात 65 किलो वजनी गटात मोहितकुमार फ्रिस्टाईल ज्युनियर विश्व कुस्ती स्पर्धेत सहभाग, ऑलिम्पियन दीपक पुनिया, एशियन स्पर्धेत सहभाग घेतलेला. 125 किलो गटात दिनेश, ग्रिक रोमन राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता, महिला गटात 97 किलो वजनी गटात सोनू, महिला विश्व एशिया पदक विजेती, 68 किलो वजनी गटात प्रियांका सेनादल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता, 53 किलो गटात ज्योती आंतरराष्ट्रीय पदक विजेता, 74 किलो गटात जयदीप एशियन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी घेतलेला, 76 किलो वजनी गटातील रितीका या पुरुष व महिला मंल्लाचा समावेश आहे. या आठ खेळाडू बरोबर सेना प्रमुख प्रशिक्षक विनायक दळवी तर फिजिओ फैरोज मकानदार यांच्यासमवेत हा भारतीय कुस्ती संघ रविवारी दोहा वरून जर्मनीला रवाना होत आहे.









