खेळाडूंशी संवाद : महिला खेळाडूंच्या कामगिरीतून देशातील मुलींच्या क्षमतेचे दर्शन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारताच्या आशियाई खेळांत सहभागी झालेल्या आणि विक्रमी संख्येने पदके मिळविलेल्या चमूशी संवाद साधला आणि त्यांनी इतिहास रचल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे आणि यातून देशाच्या मुलींची क्षमता दिसून येते.
‘मला अभिमान आहे की, आमच्या ’नारीशक्ती’ने आशियाई क्रीडास्पर्धेत चांगली कामगिरी केली. ती भारतातील मुलींची क्षमता व्यक्त करते’, असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या टिपणीत म्हटले. भारतीय पथकाच्या कामगिरीमुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण असल्याचे ते म्हणाले. ‘तुम्ही इतिहास रचला आहे. 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तुमच्या मेहनतीमुळे आणि कर्तृत्वामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. आमच्याकडे कधीच प्रतिभेची कमतरता नव्हती. परंतु अनेक अडथळ्यांमुळे आमचे खेळाडू त्यांच्या प्रतिभेचे पदकांमध्ये रूपांतर करू शकले नव्हते’, असे ते मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात म्हणाले.
भारताने यावेळी आशियाई खेळांत प्रथमच 100 पदकांचा टप्पा ओलांडला आणि अनेक नवीन प्रकारांत पदके जिंकली. भारताने चीनमधील हांगझाऊ येथे 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य अशा विक्रमी 107 पदकांसह आशियाई खेळांची समाप्ती केली. नेमबाजी, अॅथलेटिक्स व तिरंदाजी या खेळांनी भारताच्या पदकप्राप्तीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. क्रिकेट आणि कब•ाrतील संघांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली, तर पुरुष हॉकी संघाच्या सुवर्णपदकाने त्यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून दिले. स्क्वॉशने भारताला दोन सुवर्णांसह पाच पदके मिळवून दिली. याशिवाय भारताने बॅडमिंटनमध्ये पुरुष दुहेरीतील ऐतिहासिक सुवर्णपदकासह तीन पदके जिंकली









