वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या आशियाई पुरुष आणि महिलांच्या कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघटनेने संघाची घोषणा केली असून पुरुष संघाचे नेतृत्व दीपक पुनियाकडे तर महिला संघाचे नेतृत्व अंतिम पांगलकडे सोपवण्यात आले आहे.
आशियाई पुरुष आणि महिलांची चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा 9 ते 14 एप्रिल दरम्यान कझाकस्तानमधील अॅस्टेना येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघटनेने दिल्लीत शुक्रवारी आणि शनिवारी राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेतील कामगिरीनंतरच संघाची निवड करण्यात आली.
भारतीय कुस्ती संघ-महिला – फ्रीस्टाईल : नीलम, अंतिम पांगल, सिटो, अन्शू मलिक, सरिता मोर, सोनम मलिक, मनीषा, निशा, ऋतिका, प्रिया
पुरुष- फ्रीस्टाईल : अमन सेरावत, पंकज, अनुजकुमार, मुलायम यादव, यश तुषीर, दीपक, जाँटी कुमार, दीपक पुनिया, दीपक नेहरा, अनिरुद्ध.
ग्रीको रोमन – पुरुष : रुपीन, सुमित, नीरज, आशू, विकास, साजन, रोहित दाहिया, सुनीलकुमार, नरेंद्र चिमा आणि नवीन.









