ढाका :
बांगलादेशातील ढाका येथे भारतीय वैद्यकीय विद्यार्थिनी निदा खान (19) हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. ती राजस्थानातील झालावार येथील रहिवासी असून बांगलादेशमधील अद-दीन मोमिन मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची पदवी घेत होती. एका परीक्षेत कॉपी करताना पकडल्यानंतर तिला कॉलेज प्रशासनाने पुढील परीक्षेसाठी उपस्थित राहण्यास मनाई केली होती. या प्रकारानंतर तिचा मृतदेह तिच्या वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार आढळून आला असला तरी तिच्या मृत्यूबाबत अन्य दुवेही तपासले जात असल्याचे सांगण्यात आले. मृतदेह भारतात पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय दुतावासालाही कळवण्यात आले आहे.









