वृत्तसंस्था/ मुंबई
पुढील वर्षी 2 ते 9 मार्चदरम्यान एकूण 19 सामन्यांचा समावेश असलेली ‘टी10’ स्वरूपातील सहा संघांची टेनिसबॉल लीग येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील. ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग’ नावाच्या या लीगमध्ये मुंबई (महाराष्ट्र), हैदराबाद (आंध्र प्रदेश व तेलंगण), बेंगळूर (कर्नाटक), चेन्नई (तामिळनाडू), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि श्रीनगर (जम्मू व काश्मीर). यांचे प्रतिनिधीत्व करणारे फ्रेंचायझींच्या मालकीचे संघ असतील. 16 खेळाडूंचा संघ राहील आणि प्रत्येक संघासाठी सहा सदस्यीय सपोर्ट स्टाफ देखील असेल, ज्याची एकूण फी 10 लाख ऊपये असेल. तसेच माजी रणजी खेळाडूसारखा एक मार्गदर्शकही सोबत असेल. त्याची फी 15 लाख ऊपये राहील. त्याशिवाय प्रत्येक संघात एक ’सेलिब्रेटी अँकर ओनर’ असेल.









