वृत्तसंस्था / नवी दिल्ली
न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या 74 हजार अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय खुल्या क्लासिक स्क्वॅश स्पर्धेत भारताचे वेलावन सेंथीलकुमार, वीर छोत्रानी आणि रमित टंडन यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेक्सीकोच्या कार्डेन्सने विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन सेंथीलकुमारचा 11-7, 11-6, 11-4 तर दुसऱ्या एका लढतीत इंग्लंडच्या वॉलेरने भारताच्या रमित टंडनचा 6-11, 11-9, 11-8, 8-11, 11-7 त्याच प्रमाणे फ्रान्सच्या व्हिक्टर क्रोयुनने भारताच्या वीर चोटरानीचा 11-1, 11-8, 11-5 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.









