वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय 17 वर्षांखालील पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस यांनी शुक्रवारी श्रीलंकेत होणाऱ्या सॅफ यू-17 वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेसाठी 23 सदस्यीय संघाची घोषणा केली. गोव्यात दोन महिने सराव करत असलेला भारतीय युवा संघ शनिवारी दुपारी कोलंबोला पोहोचतील. भारताचा गट ब मध्ये समावेश आहे जिथे त्यांचा सामना मालदीव (16 सप्टेंबर), भूतान (19 सप्टेंबर) आणि पाकिस्तान (22 सप्टेंबर) यांच्याशी होईल. उपांत्यफेरी 25 सप्टेंबर रोजी होईल आणि त्यानंतर अंतिम सामना 27 सप्टेंबर रोजी होईल. सर्व सामने रेसकोर्स आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील. भारत हा विद्यमान विजेता आहे, गेल्या वर्षी भूतानमध्ये बांगलादेशला 2-0 ने हरवून एसएफफ अंडर 17 चे विजेतेपद जिंकले होते. ब्लू कोल्ट्सचे दीर्घकालीन ध्येय सॅफ यू-17 आशियाई कप 2026 साठी पात्रता मिळवण्याचे आहे, ज्यासाठी पात्रता फेरी नोव्हेंबर 2025 मध्ये अहमदाबाद येथे होणार आहे.
संघ: गोलरक्षक: मनशज्योती बारुआ, मारूफ शफी, राजरूप सरकार, बचावपटू: हौलुंगौ माटे, इंद्र राणा मगर, कोन्थौजम कोरो मैतेई, मोहम्मद आयमान बिन, आर लॉमसांगझुआला, शुभम पुनिया, थांगगौमांग टौथांग, युमनाम मदिनो सिंग. मिडफिल्डर: अबरार अली बाबा, डल्लालमुऑन गंगटे, थोकचोम डायमंड सिंग, वांगखेम डेनी सिंग, येंगखोम नितीशकुमार मैतेई. फॉरवर्ड : अजीम परवीझ नजर, अझलान शाह ख, गुनलीबा वांगखिराकपम, हृषिकेश चरण मानवथी, कमगौहाओ डोंगेल, लेस्विन रेबेलो, रेहान अहमद.









