संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेमधून रणभूमीत सहभागी, लेबनॉन सीमेवर भारतीय सुरक्षा दल कर्मचारी तैनात
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. इस्रायली संरक्षण दल गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बफेक करत आहेत. या दोघांमधील युद्धादरम्यान लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्लाहही इस्रायलवर हल्ले करत असताना त्यांचे सैन्यबळ अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहेत. युद्धाने वेढलेल्या इस्रायलच्या मदतीसाठी भारतीय सुरक्षा दल पोहोचले आहे. इस्रायल आणि लेबनॉनच्या दक्षिण सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दल दक्ष आहेत. संयुक्त राष्ट्राच्या शांतता सेनेमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय सुरक्षा कर्मचारी आणि भारतीय सेवा सक्रीयपणे कार्यरत झाल्या आहेत. भारतीय सुरक्षा दल हे काम संयुक्त राष्ट्राच्या शांतता रक्षक दलासाठी करत आहेत.









