India- China Border Dispute : अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय आणि चिनी सैन्याने काही काळ चकमक उडाली. आज 9 डिसेंबर रोजी झालेल्या या चकमकीत दोन्ही बाजूंचे जवान आमने-सामने आले. एकंमेकाला भिडलेल्या या जवानांमध्ये धक्काबुक्की आणि मारहणीचा प्रकार घडला असून काही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये हा प्रकार घडला आहे. चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली त्यामुळे भारतीय सैनिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे धक्काबुक्की होउन प्रकरण मारहाणीपर्यंत गेले. यापुर्वी पूर्व लडाखमध्ये झालेल्या घटनेनंतर भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेली ही पहिलीच चकमक असल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेनंतर भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी शांतता पुन्र्थापित करण्यासाठी चर्चा करण्यासाठी चीनच्या समकक्ष अधिकाऱ्यांशी ध्वज बैठक बोलावली.
यापुर्वी जून 2020 मध्ये गलवान व्हॅली येथे अशी चकमक झाली होती त्यामध्ये 20 भारतीय शहिद झाले होते तर 40 हून अधिक चिनी सैनिक ठार आणि जखमी झाले होते. गलवान घटनेमुळे दोन्ही राष्ट्रांमधील वातावरण अत्यंत तणावपुर्ण बनले होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









