किरकोळ अपघातानंतर धक्काबुक्की
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधिताचे नाव जसमेर सिंग असून ते 66 वर्षांचे होते. न्यूयॉर्क शहरात घडलेल्या एका किरकोळ कार अपघातानंतर एका 30 वषीय व्यक्तीने वृद्ध शीख इसमाला जोरदार धक्काबुक्की केली. 19 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्यानंतर त्यांना डोक्मयाला मार लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले. आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी वृद्धाला मारहाण करणाऱ्या आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे. न्यूयॉर्कमध्ये एका आठवड्यात शीख व्यक्तीवर झालेला हा दुसरा हल्ला असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात, रिचमंड हिलमध्ये बसमधून गुऊद्वाराकडे जात असताना एका 19 वषीय शीख मुलावर हल्ला करण्यात आला होता.
जसमेर सिंग हे चालवत असलेली कार ऑगस्टीन नामक व्यक्तीच्या वाहनाला धडकल्यामुळे त्याच्या कारला स्क्रॅच पडले. या अपघातानंतर ऑगस्टीन याने अतिशय रागाने गाडीतून उतरत जसमेर सिंग यांना ठोसे आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जसमेर सिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी या घटनेचा निषेध करत शीख समुदायातील व्यक्तींचे रक्षण करण्याचे सुतोवाच केले आहे.









