वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कझाकस्तानमध्ये 16 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 16 व्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अखिल भारतीय नेमबाजी संघटनेने सोमवारी 35 सदस्यांचा भारतीय नेमबाजी संघ जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये मनु भाकरला वगळण्यात आले आहे. अखिल भारतीय रायफल संघटनेने येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आयएसएसएफच्या कनिष्ठ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघ निवडला आहे.
कनिष्ठ आणि वरिष्ठांची ही नेमबाजी स्पर्धा चीनमधील निंगबो येथे 7 ते 15 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. वरिष्ठांच्या स्पर्धेसाठी 35 सदस्यांचा संघ निवडण्यात आला असून हे भारतीय नेमबाज 15 विविध नेमबाजी प्रकारात भाग घेतील. त्यामध्ये तीन मिश्रसांघिक नेमबाजी प्रकारांचा समावेश आहे. भारताची अव्वल महिला नेमबाज मनु भाकर महिलांच्या 10 मीटर तसेच 25 मीटर पिस्तूल नेमबाजी प्रकारात सहभागी होत आहे. भारताच्या वरिष्ठ संघामध्ये रूद्रांक्ष पाटील, अंजुम मोदगिल, ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर, सौरभ चौधरी, किनान चेन्नाई, इशा सिंग, मेहुली घोष, किरण जाधव यांचा समावेश आहे. मात्र निंगबोमधील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय नेमबाजी संघामध्ये भारताचा ऑलिंम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि राही सरनोबत यांना मात्र संधी देण्यात आलेली नाही.









