वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मनीतील सुहेल येथे 1 जूनपासून सुरू होणाऱ्या कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी अखिल भारतीय रायफल संघटनेने 39 जणांचा भारतीय नेमबाज संघ जाहीर केला. हा निवडण्यात आलेला संघ जर्मनीतील स्पर्धेनंतर कोरियात जुलै महिन्यात होणाऱ्या कनिष्ठांच्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार आहे.
भारतीय नेमबाज संघ : सिमरनजित कौर ब्रार, राजकवर सिंग संधू, समीर, अभिनव शॉ, धनुष श्रीकांत, शार्दुल विहान, प्रीती रजक, गौतमी भानोत, स्वाती चौधरी, अभिनव चौधरी, शुभम बिस्ला, सबिरा हॅरीस, हरमेहर सिंग लेली यांचा समावेश आहे.









