वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सायप्रसमध्ये 3 ते 12 मे दरम्यान होणाऱ्या आयएसएसएफच्या विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेसाठी अखिल भारतीय रायफल संघटनेने भारतीय नेमबाजी संघाची घोषणा केली आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजी संघाची घोषणा राष्ट्रीय निवड धोरणानुसार करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारताचा नेमबाज किनान चेनाई पुरुषा विभागांचे तर राजेश्वरी कुमारी महिलांच्या विभागाचे प्रतिनिधीत्व करेल. पुरुषांच्या विभागामध्ये एकूण 3 नेमबाजांचा समावेश राहिल. मिराज अहम्मद खानला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. तर महिलांच्या स्किट नेमबाजीसाठी माहेश्वरी चव्हाणला संधी देण्यात आली आहे. सायप्रसमधील स्पर्धेपूर्वी आयएसएसएफच्या दोन विश्वचषक नेमबाजी स्पर्धा अर्जेंटिना आणि पेरु येथे एप्रिल महिन्यात आयोजित केल्या आहेत.









