वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी भारतीय वंशाच्या रिचर्ड आर वर्मा यांना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील उच्च राजनैतिक पदासाठी नामांकन दिले आहे. व्यवस्थापन आणि संसाधन विभागात राज्य उपसचिव म्हणून रिचर्ड वर्मा यांची वर्णी लावण्यात आली आहे. वर्मा हे मास्टरकार्डचे मुख्य कायदेशीर अधिकारी आणि ग्लोबल पब्लिक पॉलिसीचे प्रमुख आहेत. ओबामा प्रशासनाच्या काळात ते भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि सहाय्यक परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत होते.









