देशासाठी गर्वाची बाब : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आनंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
51 वर्षीय पाद्री जॉर्ज जॅकब कूवाकड यांना पोप फ्रान्सिस यांच्याकडून कार्डिनल करण्यात आले आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ही भारतासाठी गर्वाची आणि आनंदाची बाब असल्याचे मोदींनी स्वत:च्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद पेले आहे.
पोफ फ्रान्सिस यांच्याकडून कूवाकड यांना पवित्र रोमन कॅथोलिक चर्चचे कार्डिनल करण्यात आल्याने आनंद झाला. जॉर्ज कार्डिनल कूवाकड यांनी स्वत:चे जीवन मानवाच्या सेवेत समर्पित पेले आहे. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा असे मोदींनी म्हटले आहे.
प्रसिद्ध सेंट पीटर्स बेसिलिकामध्ये आयोजित सोहळ्यात जगभरातील पाद्री आणि महत्त्वाच्या लोकांनी भाग घेतला होता तसेच विविध देशांच्या 21 नव्या कार्डिनल्सना सामील करण्यात आले होते. केरळच्या चंगनास्सेरी आर्चडायोसिस येथून येणारे कार्डिनल कूवाकड यांच्या नियुक्तीमुळे भारतीय कार्डिनल्सची संख्या 6 झाली आहे. यामुळे व्हॅटिकनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व आणखी मजबूत होणार आहे. केरळमधून मोठ्या संख्येत ख्रिश्चन समुदायाचे लोक कूवाकड यांच्या कार्डिनलची पदोन्नती पाहण्यासाठी व्हॅटिकन सिटीमध्ये पोहोचले आहेत.
सद्यकाळात व्हॅटिकनमध्ये वास्तव्य करणारे कूवाकड हे पोप फ्रान्सिस यांच्या आंतरराष्ट्रीय दौरा कार्यक्रमांचे आयोजन करतात. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथे 11 ऑगस्ट 1973 रोजी जनमलेले कूवाकड यांनी प्रतिष्ठित पोंटिफिकल एक्लेसियास्टिकल अकॅडमीत प्रशिक्षण प्राप्त केले आहे. 2006 साली त्यांनी अल्जीरियात अपोस्टोलिक नन्सिएचरमध्ये स्वत:ची कारकीर्द सुरू केली होती. त्यांनी अल्जीरिया, दक्षिण कोरिया, इराण, कोस्टा रिका आणि व्हेनेझुएलामध्ये अपोस्टोलिक नन्सिएचरमध्ये सेवा केली आहे. केरळच्या 3.2 कोटी लोकसंख्येत सुमारे 18 टक्के खिश्चनधर्मीय आहेत, यात कॅथोलिक प्रमुख समूह असून जो राज्याच्या 50 टक्के ख्रिश्चनधर्मीयांचे प्रतिनिधित्व करतो.









