वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱ्यावर गेला असून या संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. विंडीजमध्ये दाखल झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी बिच व्हॉलीबॉलचा आनंद पुरेपूर उपभोगला.
भारतीय संघाचे विंडीजमध्ये आगमन झाल्यानंतर काही वेळ त्यांनी विश्रांती घेतली. या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातील इतर खेळाडू अद्याप विंडीजमध्ये दाखल झाले नसल्याने संघ व्यवस्थापनाने येथे आलेल्या खेळाडूंना दोन दिवसांची कालावधी सरावासाठी दिला आहे. भारतीय संघातील खेळाडू आपल्या सराव सत्राला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी काहीवेळ बिच व्हॉलीबॉल खेळला. यामध्ये विराट कोहली. इशान किसन तसेच अन्य काही खेळाडूंचा समावेश होता. भारत आणि विंडीज यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 12 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या कसोटी मालिकेनंतर उभय संघात वनडे आणि टी-20 मालिका खेळविल्या जाणार आहेत. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय संघाचा हा पहिला विंडीज दौरा आहे.









