वृत्तसंस्था/बेंगळूर
येथे सुरू असलेल्या भारतीय कनिष्ंठ महिलांच्या लीग 2 फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात इंडियन अॅरोज महिला संघाने विजयी सलामी दिली. या सामन्यात इंडियन अॅरोज संघाने पुधुवाई युनिकॉर्न्सचा 2-1 असा पराभव केला. सदर स्पर्धा येथील पदुकोन-द्रविड क्रीडा संकुलामध्ये खेळविली जात आहे. या सामन्यात 11 मिनिटाला अभिस्ता बेस्नेटने इंडियन अॅरोजचे खाते उघडले. सामन्याच्या मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना एम. किर्तनाने पुधुवाई युनिकॉर्न्सला बरोबरी साधून दिली. उत्तराधार्थातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर व्हॅलेना फर्नांडीसने 49 व्या मिनिटाला इंडियन अॅरोजचा दुसरा आणि निर्णायक गोल केला.









