नवी दिल्ली :
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून भारताला रशियाकडून तेल घेणे बंद करण्यासंदर्भातील धमकी दिल्यानंतर देखील भारतीय तेल कंपन्यांनी तेथून तेलाची आयात करणे सुरूच ठेवले आहे. रशियाकडून सवलतीत मिळणारे कच्चे तेल खरेदी करण्यासाठी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरकरता कच्च्या तेलाची ऑर्डर नोंदवली असल्याचे समजते. सदरच्या कंपन्यांनी जुलैमध्ये कच्च्या तेलाची खरेदी काही कालावधीसाठी थांबवली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाकडून भारताने तेल आयात केल्यास पेनल्टी आकारण्याची धमकी दिली होती. असे जरी असले तरी या दोन कंपन्यांनी रशियामधून कच्च्या तेलाची आयात सवलतीच्या दरात करण्याचे धोरण सुरूच ठेवले आहे.









