वृत्तसंस्था / इंफाळ
2025 च्या ड्यूरँड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या फ गटातील चुरशीच्या सामन्यात भारतीय नौदल (इंडियन नेव्ही) संघाने रियल काश्मिर एफसीचा 2-1 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
या सामन्यात इंडियन नेव्ही संघातर्फे विजय मरांडीने 6 व्या मिनिटाला तर व्ही.जी. श्रेयसने 70 व्या मिनिटाला गोल केले. रियल काश्मिरतर्फे एकमेव गोल फ्रँक विलियमने 64 व्या मिनिटाला नोंदविला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत इंडियन नेव्हीने रियल काश्मिरवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. या विजयामुळे इंडियन नेव्ही संघाने पूर्ण गुण वसुल केले.









