मुस्लीम वर्ल्ड लीगच्या महासचिवांकडून भारताचे कौतुक : भारतीय ज्ञानाचे मानवतेसाठी योगदान
वृत्तसंस्था~ / नवी दिल्ली
मुस्लीम वर्ल्ड लीगचे महासचिव डॉक्टर मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इस्सा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. अल- इस्सा यांनी मंगळवारी विविधतेतील एकतेसाठी भारताची प्रशंसा केली आहे. भारतीय मुस्लिमांना स्वत:चे राष्ट्रीयत्व आणि घटनेबद्दल गर्व असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. अल- इस्सा यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात भाग घेतला आहे.
आम्ही एक संयुक्त उद्देशासोबत विविध घटक अणि विविधतेपर्यंत पोहोचलो आहोत. भारतीय ज्ञानाबद्दल बरेच काही ऐकले आहे. भारतीय ज्ञानाने मानवतेसाठी मोठे योगदान दिले असल्याचे आम्ही जाणतो. भारत जगाला शांततेचा संदेश देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. शांततापूर्ण मार्गाने सह-अस्तित्वात राहणे आमचा एक संयुक्त उद्देश आहे. भारतात राहणारे मुस्लीम स्वत:च्या नागरिकत्व आणि देशाच्या घटनेवर गर्व करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारताचा इतिहास आणि विविधतेचे आम्ही कौतुक करतो. विविध संस्कृतींदरम्यान संवाद प्रस्थापित व्हावी ही काळाची गरज आहे. हिंदुबहुल असूनही भारत हा धर्मनिरपेक्ष त्देश आहे. अशा स्थितीत येथील मुस्लिमांना भारतीय असण्याबद्दल गर्व असल्याचे इस्सा यांनी म्हटले आहे.
डोवालांकडून इस्सा यांचे कौतुक
मुस्लीम वर्ल्ड लीगच्या महासचिवांचा आपण सर्वांनी सद्भावना आणि शांततेत रहावे असा स्पष्ट संदेश असल्याचे डोवाल यांनी म्हटले आहे. इस्लामविषयी इस्सा यांचा अभ्यास, आंतर-धार्मिक सौहार्दाच्या दिशेने निरंतर प्रयत्न, सुधारणांच मार्गावर सातत्याने पुढे जात राहण्याच्या साहसाने इस्लाम अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास कौतुकास्पद योगदान दिले आहे. तसेच कट्टरवादी विचारसरणींना युवावर्गात स्थान मिळवून देण्यापासून रोखण्याचे काम इस्सा यांनी केल्याचे उद्गार डोवाल यांनी काढले आहेत. अल-इस्सा हे मुस्लीम वर्ल्ड लीगचे महासचिव आहेत. सौदी अरेबियातील ही संघटना जगभरातील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करते.
भारतात कुठलाच धर्म धोक्यात नाही
भारत हा अनेक दशकांपासून दहशतवादाने पीडित राहिला आहे. भारत स्वत:ची सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी अन्य देशांसोबत सहकार्य करण्यासह विविध माध्यमांमधून दहशतवादाशी लढण्यासाठी सक्रीयपणे काम करत आहे. भारतात कुठलाच धर्म धोक्यात नाही, भारत सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संयम, संवाद अन् सहकार्याला बळ देतो. भारतात सर्वांना समान अधिकार आहेत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्मांना स्थान देण्यास भारत यशस्वी ठरला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लीम लोकसंख्या असणारा हा देश असल्याचे डोवाल यांनी म्हटले आहे.









