वृत्तसंस्था / बेंगळूर
काही अव्ल हॉकी देशांविरुद्ध फलदायी सामन्यांच्या अपेक्षा ठेवून भारतीय पुरुष संघ gरुवारी एफआयएच प्रो लीग 2024-25 च्या युरोपियन लेगसाठी रवाना झाला. स्पर्धेचा युरोपियन सेगमेंट 7 जून ते 22 जून दरम्यान नेदरलँड्समधील अॅमस्टेलवीन आणि बेल्जियममधील अँटवर्प येथे होईल. प्रो लीगमध्ये भारत सध्या इंग्लंड आणि बेल्जियम (प्रत्येकी 16 गुण) नंतर 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारत 7 आणि 9 जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध सलग दोन सामन्यांनी युरोपियन लेगची सुरवात करेल. त्यानंतर 11 आणि 12 जून रोजी अॅमस्टेलवीनमधील वेगेनर स्टेडियमवर अर्जेंटिनाविरुद्ध डबल-हेडर सामना खेळेल. त्यानंतर संघ 14 आणि 15 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी अँटवर्पला रवाना होईल आणि त्यानंतर 21 आणि 22 जून रोजी यजमान बेल्जियमरुद्ध दोन महत्त्वाच्या सामन्यानंसह शेवटचा प्रास होईल.









