वृत्तसंस्था / लंडन
कब•ाr या भारतीय क्रीडा प्रकारावर यजमान देशाच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी पुन्हा एकदा वर्चस्वाची मोहर उमटविली. इंग्लंडमध्ये झालेल्या 2025 च्या विश्व चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात भारताने यजमान इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद पुन्हा एकदा स्वत:कडे राखले तर महिलांच्या विभागात भारताने यजमान इंग्लंडवर मात करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
सदर स्पर्धा इंग्लंडमध्ये 17 ते 23 मार्च या आठवडाभराच्या कालावधीत खेळविली गेली. ही स्पर्धा इंग्लंडमधील प्रमुख चार शहरांमध्ये घेतली गेली. आशिया खंडाबाहेर पहिल्यांदाच ही स्पर्धा यावेळी इंग्लंडमध्ये घेण्यात आली होती.
पुरुष विभागातील अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 44-41 अशा तीन गुणांच्या फरकाने पराभव करत विजेतेपद पटकाविले. हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झ्घला. या लढतीत मध्यंतरापर्यंत भारताने इंग्लंडवर 10 गुणांची आघाडी मिळविली होती. इंग्लंड संघातील हुकमी रायडर श्रेयेस अण्णादातेने आपल्या हुकमी चढाईवर आपल्या संघाला 3 गुण मिळवून दिले. तर इंग्लंड संघातील बचाव फळीत खेळारा मनदीप सिंगची कामगिरी अप्रतिम झाल्याने भारताची आघाडी कमी होवून केवळ 4 गुणांवर आली. त्यानंतर भारतीय संघातील मंथिराम अरुमुगमने आपल्या शेवटच्या मिनिटातील चढाईवर इंग्लंडचे काही गडी बाद करुन आपल्या संघाला 3 गुणांच्या फरकाने विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.
भारतीय पुरुष संघाने या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात हाँगकाँग चायनाचा 53-15 अशा गुण फरकाने एकतर्फी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला तर यजमान इंग्लंडने वेल्सचे आव्हान 72-25 अशा गुणांनी संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. पुरुष गटातील तिसऱ्या स्थानासाठी (कांस्य) झालेल्या सामन्यात हाँगकाँग चायनाने वेल्सचा 75-14 असा पराभव केला. या स्पर्धेतील विजेत्या संघांना देण्यात येणाऱ्या बक्षीस रक्केमचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर झालेला नाही. पण भारतीय पुरूष आणि महिला संघांना स्पर्धा आयोजकांकडून तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून निश्चितच मोठी रक्कम बक्षीसादाखल मिळणार असल्याचे समजते. इंग्लंडमध्ये विश्व चषक जिंकलेल्या भारतीय पुरूष आणि महिला कबड्डी संघातील खेळाडू आता मायदेशी परणार असून ते आता येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या प्रो कब•ाr लीगच्या अकराव्या हंगांमासाठी जोरदार तयारी करतील.
महिलांच्या विभागातील झालेल्या अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा 57-36 अशा गुणांनी पराभव करत पुन्हा एकदा विश्व चषकावर आपले नाव कोरले. या अंतिम सामन्याला ब्रिटनमधील भारतीय वंशाचे शौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाचे नेतृत्व रिटू नेगी करत होती. इंग्लंडतर्फे उपकर्णधार सॅली हिल हिची कामगिरी दर्जेदार झाली









