सिडनी :
सोशल मीडियावर वर्णद्वेषी टिप्पणींना तोंड दिल्यावर भारतीय वंशाच्या प्रशासकाने ऑस्ट्रेलियातील शहराच्या महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. व्हिक्टोरियाच्या मेरीबर्नोन्गचे महापौर प्रदीप तिवारी यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविण्याचा आरोप झाला आहे. या घटनेनंतर केवळ तिवारी यांनाच नव्हे तर पूर्ण भारतीय समुदायाला लक्ष्य करण्यात आले. भारतीय असल्याबद्दल करण्यात आलेल्या वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आल्या असल्याचे म्हणत लोकांनी माझ्या वारशाची थट्टा उडविणे गैर असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.









