तिसऱ्या सत्रात बुधवारी सेन्सेक्स 208 तर निफ्टी 62.60 अंकांनी नुकसानीत
मुंबई
चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी जागतिक पातळीवरील संकेतामध्ये मिळता-जुळता कल राहिल्याने बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये सेन्सेक्स 208 अंकांनी घसरला तर निफ्टी 18,300 च्या खाली राहिली आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये बुधवारी औषध क्षेत्रातील समभागात सलगची वाढ राहिली. यासोबतच आर्थिक आणि धातू क्षेत्रातील समभाग हेही नुकसानीत राहिले. जिंदाल सॉचे समभाग हे मात्र 7 टक्क्यांनी वधारले. तर अदानी एंटरप्राईजेसचे समभाग 6 टक्क्यांनी घसरुन बंद झाले.
भारतीय शेअर बाजारात बुधवारी चढ-उतार राहिला होता. यामध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 208.01 अंकांसोबत 0.34 टक्क्यांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 61,773.78 वर बंद झाला आहे. यांच्या दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 62.60 अंकांच्या नुकसानीसोबत 0.34 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 18,285.40 वर बंद झाला.
प्रमुख कंपन्यांमध्ये 30 समभागांपैकी 12 समभाग हे लाला निशानासोबत बंद झाले. तर 18 समभाग मात्र तेजी नेंदवत बंद झाले. यावेळी मुख्य कंपन्यांमध्ये सुदर्शन केमिकल्सचे समभाग हे 11.87 टक्क्यांनी वधारले आहेत.
दीपक नाइट्रेडचे समभाग 9.49 टक्क्यांनी मजबूत झाले यासह एबीसीसी इंडियाचे शेअर 7.58 टक्के व रियल इस्टेट क्षेत्रातील इंडिया बुल्स रियल स्टेटचे समभाग हे 8.64 टक्क्यांनी वधारले आहेत. याच दरम्यान सनफार्मा, इंडसइंड बँक, आयटीसी, टायटनचे समभाग हे 1 टक्क्यांनी मजबूत राहिले आहेत. तसेच पॉवरग्रिड कॉर्प, मारुती सुझुकी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, एनटीपीसी, विप्रो आदीचे समभाग हे हलक्या तेजीत राहिले होते.
दिग्गज कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्राइजेसचे समभाग सर्वाधिक घसरले आहेत. यासोबतच कमिन्स इंडिया लिमिटेड 5.31 टक्के, फ्यूचर कझ्युमर 4.76, जॉन्सन कंट्रोल्स हिटॅची एअरचे समभाग 4.37 आणि डीएसजे किम लर्निगचे 4.17 टक्क्यांनी घसरले आहेत. यासह टाटा मोर्ट्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसीचे समभाग 2 टक्क्यांनी घसरुन बंद झाले. यावेळी बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक बँक, नेस्ले या कंपन्यांचे समभाग काहीशा घसरणीसोबत बंद झाले.









