बलात्कार प्रकरणात दोषी
वृत्तसंस्था/ सिडनी
पाच कोरियन महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने एका भारतीय समुदायाच्या व्यक्तीला 40 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बालेश धनखड (43) असे संबंधिताचे नाव असून 7 मार्च रोजी डाउनिंग सेंटर जिल्हा न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेंतर्गत त्याला 30 वर्षांपर्यंत पॅरोलची शक्यता नाही. धनखडने बनावट नोकरीच्या जाहिराती वापरून महिलांना अडकवले. या महिला 21 ते 27 वयोगटातील असून त्यात दक्षिण कोरियाच्या नागरिक होत्या. त्याने त्या महिलांना आपल्या सिडनीतील घरी किंवा आजूबाजूला आमंत्रित करत त्यांना नशा देणारे पदार्थ देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार केला. 2023 मध्ये ज्युरी खटल्यानंतर त्याला 13 गुह्यांसह 39 गुह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते.









