वृत्तसंस्था / अँटवर्प
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवत युरोपियन दौऱ्यात सलग दुसरा विजय नोंदविला.
मंगळवारी हॉकी सेंटर ऑफ एक्सलन्स येथे झालेल्या पहिल्या हाफमध्ये गोलशुन्य खेळानंतर भारताकडून लालथंतलुआंगी (35) आणि गीता यादव (5-9 यांनी गोल केले. लालथंतलुआंगीने पेनल्टी स्ट्रोकवर यशस्वीरित्या रुपांतर केल्यानंतर भारताने पहिला गोल केला. शेवटच्या क्वार्टरमध्ये व्हॅन हेलेमोंट (48) ने फील्ड गोलद्वारे बरोबरी साधली. तथापि, दोन मिनिटानंतर गीताने फील्ड गोल करुन भारतासाठी विजय गोल केला. त्यानंतर भारताने शेवटच्या 10 मिनिटांत बेल्जियमच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी चांगला बचाव केला. पहिल्या सामन्यात भारताने बेल्जियमवर 3-2 असा विजय मिळवला होता आणि पाहुण्या संघ 12 जून रोजी तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात त्यांच्या युरापियन संघांविरुद्ध खेळेल.









