वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कनिष्ठ भारतीय महिला हॉकी संघ 25 मेपासून अर्जेंटिनामध्ये होणाऱ्या चार देशांच्या स्पर्धेत भाग घेईल आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीला सुऊवात करेल. संघ रोझारियोला जाईल जिथे ते यजमान अर्जेंटिना, उऊग्वे आणि चिलीविऊद्ध सहा मैत्रीपूर्ण सामने खेळतील.
भारत 25 मे रोजी चिलीविऊद्धच्या सामन्याने मोहिमेची सुऊवात करेल आणि दुसऱ्या दिवशी उऊग्वेचा सामना करेल. विश्रांतीच्या दिवसानंतर संघ 28 मे रोजी अर्जेंटिनाचा सामना करेल. संघ परतीच्या सामन्यात 30 मे रोजी चिली, 1 जून रोजी उऊग्वे आणि 2 जून रोजी अर्जेंटिनाशी लढेल. हा दौरा डिसेंबर, 2025 मध्ये चिलीतील सांतियागो येथे होणाऱ्या कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषकासाठीच्या संघाच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे हॉकी इंडियाने म्हटले आहे.
आम्ही या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या कनिष्ठ विश्वचषकाची तयारी करत आहोत. विश्वचषक लक्षात घेऊन या संघातील सर्वोत्तम खेळाडूंना टिपण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे प्रशिक्षक तुषार खांडकर म्हणाले. आमचे उद्दिष्ट शक्य तितका अनुभव मिळवणे आणि मागील कामगिरीवरून आपण किती सुधारणा केली आहे ते समजून घेणे हे आहे, असेही ते म्हणाले.
प्रतिस्पर्धी संघांबद्दल विचारले असता खांडकर पुढे म्हणाले की, जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय सामना खेळता, मग तो दौरा असो, द्विपक्षीय मालिका असो, कसोटी सामना असो किंवा स्पर्धा असो, तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करत असता. त्यामुळे उद्दिष्ट नेहमीच सर्वोत्तम योगदान देणे आणि प्रतिस्पर्ध्याची पर्वा न करता तुमच्या पूर्ण क्षमतेनुसार कामगिरी करणे हे असते. या स्पर्धेत आमचे मुख्य लक्ष्य आमच्या रणनीती प्रभावीपणे अंमलात आणणे आणि मुलींना शक्य तितक्या जास्त सामन्यांत खेळण्याच्या संधी देणे हे असेल, जेणेकरून त्यांना कनिष्ठ विश्वचषकापूर्वी आवश्यक अनुभव आणि आत्मविश्वास मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. भारतीय संघ 21 मे रोजी रोझारियोला रवाना होणार आहे.









