वृत्तसंस्था / बेंगळूर
11 ते 18 ऑक्टोबर दरम्यान मलेशिया येथे होणाऱ्या सुलतान जोहोर कपच्या 13 व्या आवृत्तीसाठी मंगळवारी संध्याकाळी बेंगळूर येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानळावरुन भारतीय ज्युनियर पुरूष हॉकी संघ रवाना झाला.भारताने या प्रतिष्ठित स्पर्धेच्या मागील आवृत्तीत कांस्यपदक जिंकले होते आणि या वर्षी त्यांनी एक पाऊल पुढे जाण्याचे ध्येय ठेवले आहे. चांगली तयारी असलेला संघ आणि अनुभवी आणि तरुण खेळाडूंच्या मिश्रणासहृ भारतीय संघ अव्वल आंतरराष्ट्रीय संघांविरुद्ध दमदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल.
संघ 11 ऑक्टोबर रोजी ग्रेट ब्रिटनविरुद्ध त्यांच्या मोहीमेची सुरूवात करेल. त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध सामना होईल. त्यानंतर त्यांचा शेवटचा राऊंड रॉबिन सामना 14 ऑक्टोबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान, 15 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि 17 ऑक्टोबर रोजी यजमान मलेशियाशी होईल. 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी अव्वल दोन संघ पात्र ठरतील.









