जर्मनीतील 4 राष्ट्रांची स्पर्धा, आज भारताचा सलामीचा सामना स्पेनशी
वृत्तसंस्था /डसेलडॉर्फ (जर्मनी)
भारतीय कनिष्ठ पुऊष हॉकी संघ आज शुक्रवारी स्पेनविऊद्धच्या सामन्याने 4 राष्ट्रांच्या डसेलडॉर्फ येथील स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेची सुऊवात करेल. भारत 19 ऑगस्टला यजमान जर्मनीचा आणि 21 ऑगस्टला इंग्लंडचा सामना करेल आणि 22 ऑगस्टला अंतिम सामना होईल. मलेशियामध्ये 5 ते 16 डिसेंबरदरम्यान पुरुषांची कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार असून त्याची तयारी करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचा फायदा होणार आहे. यंदा जून ते ऑगस्टदरम्यान बेंगळूर येथील साई सेंटर येथे आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर पूर्ण करून भारतीय संघ या स्पर्धेत उतरत आहे. शिबिराच्या आधी भारतीय कनिष्ठ पुऊष संघाने ओमानमधील पुऊषांची कनिष्ठ आशिया चषक स्पर्धा जिंकून कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. ही पात्रता मिळविताना त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा रोमांचकारी अंतिम लढतीत पराभव केला होता. या ऐतिहासिक विजयासह भारताने पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदे (4) मिळविण्याचा विक्रमही प्रस्थापित केला होता. प्रशिक्षण शिबिरात झालेल्या दुखापतीमुळे प्रवास करू न शकलेल्या उत्तम सिंगच्या अनुपस्थितीत विष्णुकांत सिंग भारतीय कनिष्ठ संघाचे नेतृत्व करणार आहे.