वृत्तसंस्था / नवी दिल्ली
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विश्वचषकाची तयारी सुरू ठेवून भारताचा ज्युनियर पुरूष हॉकी संघ 21 ते 25 जून दरम्यान होणाऱ्या चार देशांच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बुधवारी बर्लिनला रवाना झाला.
कर्णधार अराईजित सिंग हुंडल यांच्या नेतृत्वाखाली अमीर अली उपकर्णधार म्हणून काम करत असलेले भारतीय संघ 21 जून रोजी यजमान देश जर्मनीविरुद्ध त्यांच्या मोहीमेला सुरूवात करेल. त्यानंतर त्यांचा सामना 22 जून रोजी ऑस्ट्रेलियाशी होईल. त्यानंतर 24 जून रोजी राऊंड-रॉबिन टप्प्यात स्पेनशी होईल. सर्व सामने बर्लिनमध्ये होतील. 25 जून रोजी वर्गीकरण सामन्यांसह या स्पर्धेचा समारोप होईल. जिथे गटातील अव्वल दोन संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील. तर उर्वरित दोन संघ तिसऱ्या थानासाठी लढतील. प्रस्थानपूर्वी बोलताना कर्णधार अराईजित सिंग हुंडल यांनी या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखीत केले. 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत चेन्नई आणि मदुराई येथे विश्वचषक होणार आहे.
2025 च्या एफआयएच ज्युनियर विश्वाषक स्पर्धेपूर्वी ही स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. अवघ्या काही महिन्यात आमच्या ताकदीचे मूल्यांकन करण्याची, नवीन संयोजनांचा प्रयत्न करण्याची आणि सुधारणा करण्याची क्षेत्रे ओळखण्याचीही एक उत्तम संधी आहे, असे हॉकी इंडियाच्या एका प्रेस रिलीजमध्ये त्यांनी म्हटले आहे. आम्हाला काही सर्वोत्तम हॉकी संघांचा सामना करावा लागणार आहे. ज्यामुळस्s आम्हाला आमची ताकद तपासता येईल आणि वेगवेगळ्या रणनिती वापरुन पाहतायेतील, असे ते म्हणाले. या भावनेला दुजोरा देत अमीर अली पुढे म्हणाले, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकांपूर्वी कोणत्याही कमतरता ओळखण्यास आणि त्या दूर करण्यास हे आम्हाला मदत करेल.









