वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2023 सालातील विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा अमेरिकेत 25 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या महत्वाच्या स्पर्धेसाठी अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने मंगळवारी 16 सदस्यांचा बॅडमिंटन संघ घोषित केला.
26 ते 29 जुलै दरम्यान दिल्लीत झालेल्या निवड चाचणी प्रक्रियेनंतर या आगामी स्पर्धेकरिता भारतीय कनिष्ठ बॅडमिंटन संघाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला बॅडमिंटनपटूचे एकेरीत नेतृत्व उन्नती हुडाकडे सोपवण्यात आले आहे. या संघामध्ये उन्नती हुडा, तारा शहा, देविका सिहाल यांचा समावेश आहे. तर कनिष्ठ पुरुषांच्या विभागाचे नेतृत्व आयुश शेट्टी करीत आहे. तुषार सुवीर, लोकेश रे•ाr यांची या स्पर्धेसाठी निवड केली आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या दुहेरीसाठी निकोलास नाथन राज-तुषार सुविर, दिव्यम अरोरा-मयांक राणा, महिला दुहेरीसाठी राधिका शर्मा-तन्वी शर्मा, व्हिनेला के-श्रीयांशी वालीशेट्टी, समरवीर-राधिका शर्मा, सात्विक रे•ाr-के. वैष्णवी, खडकेकर हे या स्पर्धेत मिश्र दुहेरीत खेळणार आहेत. राधिका शर्मा-तन्वी शर्मा, व्हिनेला के-एस. वालीशेट्टी यांचा संघात समावेश आहे. अमेरिकेतील ही आगामी स्पर्धा मिश्र सांघिक प्रकाराची असून ती 25 सप्टेंबरपासून त्याचप्रमाणे वैयक्तिक प्रकारातील स्पर्धा 2 ऑक्टोबरपासून सुरु होईल.









